माइंडक्लोन्स

माणसाचे क्लोन्स तयार करणे हा विचार वैज्ञानिकांच्या मनांत अनेक वर्षांपासून घोंगावत आहे व अधून मधून तो विचार डोके वर काढतच असतो. अर्थात वैज्ञानिक आपली कल्पनाशक्ती व वैज्ञानिक ज्ञान यांची सांगड घालून नवीन नवीन शोध लावत असतो. परंतु पुढे चालून या शोधाचा माणसाने कसा उपयोग करुन घ्यायला पाहीजे व कसा करुन घेतला गेला हे त्याच्या हातात नसते व ध्यानीमनी असले तरी त्याचे त्यावर नियंत्रण नसते. म्हणून अणूउर्जेचा शोध लावणा-याला हे काय माहीत की हे अणूबॉम्ब जागतीक युध्दात वापरले जातील व लाखो लोकांना जिवाला मुकावे लागले अथवा इतर व्याधींना सामोरे जावे लागेल. पण म्हणून काही वैज्ञानिक प्रगती आपण थांबवू शकत नाही अथवा थांबवू नये. Ultrasonography चे च उदाहरण घ्या. Emergency Medicine मधे आजारांमधे व गरोदरपणी याचे योगदान अमुल्य आहे, परंतु काही थोडया स्वार्थी लोकांमुळे व जन मानसामधे जोपासलेल्या भावनेमुळे PCPNDT सारखे कायदे शासनाला बनवावे लागले व त्याचा त्रास सर्वांनाच होतो आहे.

            अच्युत गोडबोले आपल्या वैज्ञानिक लिखाणासाठी प्रसिध्द आहेत. आजच्या लोकमतमधे त्यांनी माइंडक्लोन्सवर लेख लिहला आहे. एखाद्या व्यक्तीचे विचार, अनुभव, कार्यप्रणाली, विशिष्ट लकबी, जीवनशैली, शैक्षणीक कामगीरी आदी सर्व सर्व गोष्टी एका विशिष्ट Software ला द्यायच्या. तो त्याच्यामधे असलेल्या Artificial Intelligence चा वापर करुन त्यावरुन सदर व्यक्तीचे एक Digital Model बनवून सदर व्यक्ती त्याच्या मृत्युनंतरही संबधीत नातेवाईकांच्या मित्रांच्या सहवासात राहू शकतो, म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमधे मुळ व्यक्ती जशी बोलली असती, अथवा वागली असती, अथवा सल्ला दिला असता, तसेच वागणे, बोलणे वा सल्ला देणे सदर Digital Model करु शकेल. आपल्या जवळच्या नातेवाइकांशी आईवडिलांशी ज्यांचे अतिशय घट्ट नाते होते व त्यांचा वियोग ते सहन करु शकत नाहीत त्यांच्यासाठी सदर शोध चांगले काम करु शकेल. न्युटन, सॉक्रेटीस, मार्टीन ल्युथर किंग वा तत्सम मोठे सामाजीक नेते वा वैज्ञानिक त्यांना विशिष्ट parameters दिल्यानंतर काय करावे कसे करावे याचे ही सल्ले देउ शकतील. Stephan Hawking  Black Holes बाबत अजून सखोल माहीती जगाला देउ शकेल.  कॅम नदीवरील लाकडी पुल जो आजच्या वैज्ञानिकांना इंजिनिअरांना एकही स्क्रु न वापरता जोडता आला नाही, कदाचित तो न्युटन जोडून देईल. इथपर्यंत सर्व ठिक आहे व आनंद आहे.

            परंतु आजा कल्पना करा की हिटलर, हिमलर, गोबेल्स, किम जोन्स हयांचे जर Digital Models तयार झाले तर येणा-या हजारो वर्षांपर्यंत ते ज्यु व्देष, जागतीक युध्द लोकांच्या मनांत पेरत जातील. अर्थात हे सर्व खलनायक हे बुध्दीमान होतेच यात शंका नाही. त्यांच्या बुध्दी चातुर्याचा वापर करुन आजच्या काळातील परिस्थितीत त्याचे कसे अनुकरण करावे हे ही काही लोक शिकून त्याचा अंगीकार करु शकतील. विज्ञान एकदा सार्वजनिक झाले की त्यावर समाजाचे, शासनाचे प्रशासनाचे फारसे नियंत्रण राहत नाही. PCPNDT Act जरी आला तरी भृणहत्त्या होतच आहेत. प्रमाण अल्प असेल परंतु थांबलेले नाही. तसेच हे जागतीक खलनायक जर Digital Model मधे निर्माण झाले तर का        य  ???

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: